Vietnamese Egg Coffee Recipe In Marathi

0

Learn How to make Vietnamese Egg Coffee Recipe In Marathi
युद्ध बरंच काही शिकवून जाते असे म्हणतात हे खरंच आहे .
पण युद्धामुळे एका रेसिपीचा जन्म झाला असे कुणी सांगितले तर?
व्हिएतनाम मधील सोफीटेल लेजेंड मेट्रोपॉल हॉटेलमधला एक जियांग नावाचा शेफ .
१९४६ ला फ्रेंच आणि व्हिएतनाम युद्धाच्या धामधुमीत या हॉटेल मधले दूध संपले.
तेव्हा या जियांग ने अंडे घालून कॉफी बनवली आणि ती लोकांना इतकी आवडली कि ,त्याने ती नोकरी सोडून स्वतःचे कॅफे सुरु केले.
व्हिएतनाम वासियांसाठी हि फक्त कॉफी नाही तर तर एकप्रकारचे डेजर्ट आहे .
तर आज बवूयात आपल्याला विचित्र वाटणारी पण एकदा चव घेतल्यावर हवीहवीशी वाटणारी हि व्हिएतनामी एग कॉफी

हि कॉफी बनवायला आपल्याला लागेल
२ चमचे कॉफी
एक कप पाणी
चवीला साखर
एक अंड्याचा पिवळा बलक
१ चमचा कंडेन्सड मिल्क
आधी अंड्याचा बलक आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र छान फेटून घ्या आणि मस्त फोम तयार करा
मग पाणी उकळत ठेवा आणि दोन मिनिटांनी त्यात दोन चमचे कॉफी घाला
मस्त घमघमाट पसरेल
साखर हवी असल्यास अर्धा चमचा घाला ,कारण हि कॉफी बिन साखरेची छान लागते
कॉफी उतरवून छान काचेच्या कपात घ्या अंडी त्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमचा ठेवून फेटलेला फोम सोडा
आणि ती अंड्याची कॉफी एन्जॉय करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here